in the picture: Students, Teachers, BoT, EC, and Parents at Shaala Picnic in Elliston Park (2023).

 

कॅल्गरी मराठी असोसिएशन – मराठी शाळा

ध्येय

मराठी भाषा आणि संस्कृतीची जोपासना करण्यासाठी लहानपणापासून मराठीपणाबद्दल उत्सुकता आणि प्रेम निर्माण करणे, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, कला आणि वक्तृत्व तत्सम कला गुणांना विकसित करणे; इतर वयोगटातील प्रशिक्षणार्थींना संभाषणप्रद वर्ग आयोजित करणे.

आधारस्तंभ

· स्वयंसेवी शिक्षक, समन्वयक आणि मंडळाचे सहाय्य.

· उत्तर अमेरिकेत द्वितीय किंवा तृतीय भाषा या नात्याने मराठी शिकविणे.

· उत्तर अमेरिकेच्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या सहाय्याने प्रगतीशील भाषा शिक्षण कार्यक्रम, अभ्यास साहित्य अन् शिकवणी.

· कॅल्गरी मराठी असोसिएशनच्या प्रयत्नांनी शाळा व्यवस्थापकीय मंडळाकडून द्विभाषीय साक्षरतेची मान्यता / परकीय भाषा शिक्ल्याचा शिक्का.

अभ्यासक्रमाच्या पूर्व-अटी आणि मार्गदर्शक सूचना

· इयत्ता १ ते ५ यांच्यासाठी भारती विद्यापीठ पुणे यांच्या सहकार्याने बीएमएमने विकसित केलेला पंचस्तरीय मराठी भाषा प्रगतीशील शिक्षण कार्यक्रम, अभ्यास मार्गदर्शक तत्व आणि सहाय्यक साहित्य.

· शैक्षणिक वर्ष चालू वर्षाच्या सप्टेंबर ते पुढील वर्षाच्या जून पर्यंत असते.

· प्रवेशाची अंतिम मुदत चालू वर्षाची ३० सप्टेंबर आणि पुढील वर्षीची २८ फेब्रुवारी ही असते.

· कोणत्याही विद्यार्थ्याला मराठी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी, त्या कुटुंबास चालू वर्षाचे आणि पुढील वर्षाचे कॅल्गरी मराठी असोसिएशनचे कौटुंबिक सदस्यत्व (जानेवारी ते डिसेंबर) बंधनकारक आहे – ही मुदत चालू वर्षाच्या ३० सप्टेंबरपर्यंत आणि पुढील वर्षाच्या जूनमध्ये त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत असते.

· कॅल्गरी मराठी असोसिएशनच्या संकेतस्थळावर गुगल नोंदणी अर्ज उपलब्ध.

· अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे शिक्षक कॅल्गरी मराठी असोसिएशनच्या मराठी शाळेत योग्य इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशाबद्दल मूल्यमापन करतील.

· वयाची अट – किमान – ४ वर्षे, कमाल – १३ वर्षे.

· सध्या कॅल्गरी मराठी असोसिएशनकडून कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही. तथापि, बृहन् महाराष्ट्र मंडळ परीक्षा शुल्क (US $ 25.00) आणि कार्यपुस्तिका शुल्क (US $ 5.00) आकारते जे परीक्षा अर्ज सादर करताना देय असतात.

· वर्ग प्रामुख्याने शनिवार-रेविवर (weekends) प्रत्येकी १ ते १.५ तासांच्या कालावधीसाठी ऑनलाइन घेतले जातात.

· बीएमएम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वर्ग शिक्षण दर 1 ते 2 महिन्यांतून एकदा घ्यावे लागते.

· परीक्षेला बसण्यासाठी किमान ७० टक्के उपस्थिती बंधनकारक.

· विद्यार्थ्यांकडून गृहपाठ करून घेण्याची जबाबदारी पालकांची असते.

· मराठी शिक्षण आत्मसात करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या (मराठी शाळेत जाणाऱ्या) मुलांशी मराठी भाषेत संवाद साधणे महत्वाचे आहे.

· सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी सीएमए मराठी शाळेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.

 

CMA MARATHI SHAALA

MISSION

To nurture interest for learning the Marathi language primarily in the younger generation extendable with online conversational Marathi classes for older students within the community to have a connect with the Marathi culture and heritage through listening, speaking, reading, writing, performing arts and elocution.

FOUNDATION

· Volunteering efforts and commitments of teachers, coordinators and support from the Marathi community.

· Teach Marathi as a second or third language to the students in a North American environment.

· Support of Bruhan Maharashtra Mandal (BMM) of North America in providing a progressive language learning study program, material and tutorials to our CMA Marathi Shala students.

· CMA’s efforts to work with school boards to acquire foreign language credits for Marathi through accreditation and / or seal of bi-literacy.

COURSE PRE-REQUISITES AND GUIDELINES

· A five-level “Marathi Language Learning” progressive curriculum, study guidelines and supporting materials developed by BMM in collaboration with Bharati Vidyapeeth Pune for Grades 1 to 5.

· Academic year is from September of the current year to June of the following year.

· Admission deadlines are 30th September of the current year and 28th February of the following year.

· CMA family membership (January to December) in any given year is mandatory to admit any student prior to the deadline of 30th September of the current year to start CMA Marathi Shala and 28th February to complete their academic year in June of the following year.

· Google registration forms are available on the CMA website.

· Based on the information provided in the forms, the teachers will assess the students’ placement in a suitable grade in CMA Marathi Shala.

· Age limit – Minimum 4 years, Maximum 13 years

· No annual fee charged by CMA at the present time. However, BMM charges an exam fee (USD 25.00) and workbook charges (USD 5.00) that are due when submitting exam forms.

· Classes are conducted online primarily on the weekends for a duration of 1 – 1.5 hours each.

· Per BMM guidelines, classroom teaching is to be conducted once every 1 – 2 months.

· A minimum of 70% attendance is compulsory to appear for the exam.

· Parents are responsible to get the homework done from their pupils.

· Important for parents to converse with their children (attending Marathi Shala) in the Marathi language to imbibe and maintain continuity of learning.

· All the parents and students should commit and adhere to following the CMA Marathi Shala guidelines.

Page Visit Count ::2115
Site Visit Count : 391678